मुंबईतील अनाथाश्रमात २२ मुले कोरोना पॉझिटिव्ह

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील सेंट जोसेफ स्कूल आणि अनाथालयातील 22 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 12 वर्षांखालील चार मुलांवर नायर रुग्णालयात उपचार सुरू असून 12 ते 18 वर्षांपर्यंतच्या 12 मुले आणि 6 कर्मचाऱ्यांवर भायखळ्याच्या रिचर्डसन ऍण्ड क्रुडासमधील कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. 

या अनाथाश्रमात 24 ऑगस्ट रोजी कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. 25 ऑगस्ट रोजी 22 अहवाल पॉझिटिव्ह आढळले होते. यापैकी 4 मुले 12 वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांना नायर रुग्णालयाच्या बालरोग केंद्रात ठेवण्यात आले आहे. याशिवाय 18 मुलांना रिचर्डसन आणि क्रूड्स कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी 12 मुले  12 ते 18 वर्षांचे आहेत आणि 6 मुले 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत. सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे. 

दरम्यान, कांदिवली पश्चिमेतील वीणासंगीत या 100 कुटुंबे असलेल्या सोसायटीत गेल्या महिन्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर मुंबई महापालिकेने तिथे आरोग्य शिबीर घेतले. शिबीर घेतल्यानंतर तिथे रुग्ण सापडू लागले. गेल्या महिनाभरात या सोसायटीत एकूण 14 रुग्ण सापडले असून ही इमारत सील करण्यात आली आहे. रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या