मुंबईत ११ जणांना ऑमिक्रॉनची लागण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉन हा संपुर्ण महाराष्ट्रात हातपाय पसरत आहे. परिस्थिती गंभीर होत असून, महाराष्ट्रात ऑमिक्रॉननं टेन्शन वाढवलं आहे. अशातच आता मुंबईतही ऑमिक्रॉनचा धोका वाढत आहे. सोमवारी मुंबईत ११ जणांना ऑमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात ऑमिक्रॉन संसर्गाचे २६ नवे रुग्ण आढळले असून ११ रुग्ण मुंबई  तर रायगड (पनवेल)५, ठाणे मनपा ४, नांदेड २ आणि नागपूर, पालघर, भिवंडी निजापूमर मनपा आणि पुणे ग्रामीण  प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १६७ झाली आहे.

महाराष्ट्रात ७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०३,७३३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६६% एवढे झाले आहे.

राज्यात १,४२६नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज २१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८५,४९,१३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,५९,३१४ (९.७१  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९१,४६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

पुढील बातमी
इतर बातम्या