मुंबईत २ डोसनंतरही एमबीबीएसच्या २९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील केईएम आणि सेठ जीएस मेडिकल कॉलेजमधील २९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षातील असून, दुसरा डोस घेतल्यानंतरही या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. लसीकरणानंतरही कोरोनाची लागण झाल्यानं प्रशासनाचं टेन्शन वाढलंय.

मागील २-३ दिवसांत सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांसाठी क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात त्यांनी भाग घेतला होता. त्यामुळं कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं जातं. कोरोनाची लागण झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांचे वसतिगृह सील करण्यात येण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनानं आणखी ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. या साथीच्या विखळ्यात सापडलेल्या १ लाख ३९ हजार ११ जणांना आतापर्यंत प्राणास मुकावं लागलं आहे, तर एकूण ६३,६८,५३० रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. आतापर्यंत १ लाख ३९ हजार ११ रुग्ण कोरोनाने दगावले.

बुधवारी ३ हजार १८७ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. दिवसभरात ३ हजार २५३ रुग्ण बरे होऊन परतले घरी. तर राज्यात बुधवारपर्यंत एकूण ६३,६८,५३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.२६ टक्के एवढं झालं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या