कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं केला 'इतका' खर्च

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाचा शिरकाव झाला आणि मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका उपचार आणि उपाययोजनांच्या कामाला लागल्या. या पालिकांना यापूर्वी कधीच केला नव्हता इतका खर्च आरोग्य यंत्रणेवर करावा लागला. आतापर्यंत सुमारे २ हजार कोटींहून अधिक खर्च करून मुंबई महापालिका आघाडीवर आहे.

मुंबई महानगर प्रदेशात मिळून गेल्या वर्षभरात सुमारे ३ हजार कोटींहून अधिक पैसे खर्ची पडले आहेत. मुंबईत विविध रूग्णालये आणि कोरोना केंद्रांमध्ये मिळून सुमारे १ लाख रूग्णांवर उपचार करता येतील, अशी व्यवस्था केली आहे. गेल्या वर्षभरात रूग्णालये, कोरोना केंद्रे, उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि यंत्रसामुग्रींसाठी २ हजार कोटींहून अधिक खर्च केला आहे. यासाठी आरोग्य अर्थसंकल्पातील सुमारे ५०० कोटी तर आकस्मिक निधीतून १२०० कोटींहून अधिक खर्च झाले आहेत.

अतिरिक्त खर्चासाठी ४५० कोटी जानेवारीत मंजूर झाले आहेत. कोरोनावरील खर्चासाठी प्रशासनाने मार्च २०२० मध्ये स्थायी समितीची आगाऊ मंजुरी घेऊन ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी स्थायी समितीत मंजुरीसाठी प्रशासन प्रस्ताव पाठवत नाही. खर्च झाल्यानंतर एकत्रित कार्योत्तर मंजुरीसाठी प्रस्ताव मांडले जातात. त्यास राजकीय पक्षांनी हरकत घेतली आहे. 

  • आकस्मिक निधी : १२०० कोटी
  • आकस्मिक निधी अतिरिक्त तरतूद : ४५० कोटी
  • विविध प्रमुख रूग्णालये : २०० कोटी
  • कोरोना केंद्रे : २१५ कोटी
  • सेव्हन हिल्ससह उपनगरीय रूग्णालये : ५०० कोटी
  • मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत : २५० कोटी

महापालिका आणि खर्च

  • ठाणे : ८१ कोटी १५ लाख
  • वसई-विरार : २० कोटी
  • कल्याण-डोंबिवली : १३० कोटी
  • उल्हासनगर : ५० कोटी
  • मिरा-भाईंदर : ७८ कोटी
  • नवी मुंबई : १०४ कोटी
  • भिवंडी : २८ कोटी
पुढील बातमी
इतर बातम्या