एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत मद्यविक्री महसुलात ३७ टक्के घट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्य उत्पादन शुल्क विभागाला २०२०-२१ साठी १९ हजार २२५ कोटी रुपये महसुलाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पण एप्रिल ते ऑगस्ट २० या काळात विभागाला ३ हजार ८४२ कोटी ३२ लाख रुपये महसूल मिळाला असून त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७ टक्के घट झाली आहे. या काळात बीअर विक्री तब्बल ६३ टक्क्यांनी घसरली आहे. अन्य मद्यांच्या विक्रीतही घट झाली असली तरी ती बीअरच्या तुलनेत कमी आहे.

या कालावधीत देशी मद्याची विक्री ९.४० कोटी बल्क लिटर (गेल्या वर्षीपेक्षा ३८ टक्के घट), विदेशी मद्याची ५.८८ कोटी बल्क लिटर ( ३३ टक्के घट), बीअर ५.२३ कोटी बल्क लिटर (६३ टक्के घट) आणि वाइनची १७.६२ लाख बल्क लिटर ( ३९ टक्के घट) इतकी विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात १५ मे पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत असून बुधवारी दिवसभरात ३ हजार ४७६ ग्राहकांना ही सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ३ हजार २७८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या