एसटीच्या चालक-वाहक पदाच्या भरतीसाठी 445 महिलांचे अर्ज

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एसटी महामंडळातर्फे 2 जूलैला चालक, वाहक पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्रा बद्दलची माहिती ही इ-मेल किंवा एसएमएसद्वारे लवकरच देण्यात येईल. या परीक्षेबद्दल एसटी महामंडळाने उमेदवारांना अफवा पसरविणाऱ्या तसेच निवड करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आमिषाला बळी पडू नये, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले.

जानेवारी 2017 ला चालक, वाहक पदासह लिपिक टंकलेखक आणि इतर पर्यवेक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्धीस देण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने उमेदवारांनी प्रवेश अर्ज भरले असून, त्यापैकी एसटीच्या कोकण विभागाकरिता घेण्यात येणाऱ्या चालक तथा वाहकच्या 7929 पदासाठी 28,314 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी 445 अर्ज हे महिलांचे आहेत. यांची लेखी परीक्षा 2 जुलै 2017 रोजी होणार असून, उर्वरित पदांसाठी लवकरच परीक्षेची तारीख निश्चित करण्यात येईल. चालक तथा वाहकपदाच्या लेखीपरीक्षेचे प्रवेश पत्र त्यांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठण्यात येणार असून, आपला तात्पुरता संकेत क्रमांक (password) वापरून संबंधित उमेदवारांनी आपले प्रवेश पत्र प्राप्त करून घ्यावे, असे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या