मुंबईतील आणखी ४५ ठिकाणं सील, आता मुंबईतील १९१ ठिकाणं कंटेनमेंट झोन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

काही दिवसांपूर्वीच बृहन्मुंबई महानगरपालिकेनं १४६ ठिकाणं नो-झोन म्हणून शिक्कामोर्तब केली आहेत. बुधवारी अधिकाऱ्यांनी यादी अद्ययावत केली आणि आणखी ४५ ठिकाणांची कंटेनमेंट झोनमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात येत आहे. या निर्णयामुळे व्हायरसचा प्रसार होण्यास मदत होईल.

काही भागांमधून अधिक कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे अधिका्यांनी या भागांना सील केलं आहे. म्हणूनच, कायद्यानुसार इथं प्रवेश प्रतिबंधित आहे. उल्लंघन केल्यास कायदेशीर अटींनुसार शिक्षा भोगावी लागेल. प्रसार रोखण्यासाठी अधिकारी त्या भागावर शिक्कामोर्तब करतात. याद्वारे लोकांना घरी राहण्याचं प्रोत्साहन दिलं जातं.

शहरातील वरळी कोळीवाडा, कलिना, गोरेगाव, कांदिवली, घाटकोपर आणि इतर अनेक भागांना ‘हॉटस्पॉट्स’ म्हणून टॅग केलं गेलं आहे. या झोनमध्ये जलदगती चाचणी घेण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी पुष्टी केली. या भागात अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. लोक घरं सोडू नयेत आणि या आजाराचा प्रसार होऊ नयेत यासाठी पोलिस लक्ष ठेवून आहेत. COVID 19 च्या संपर्क झाला आहे की नाही यांसाठी डोअर-टू-डोअर जाऊन स्क्रीनिंग देखील केली जात आहे.

१ एप्रिल २०२० रोजी धारावीतील आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनव्हायरस पसरल्याचं वृत्त आहे. कॉविड १९ साठी धारावीत आढळलेला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण ५६ वर्षांचा होता. पण दुर्दैवानं उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. दुसर्‍या दिवशी २ एप्रिल, २०२० रोजी, आणखी एक प्रकरण समोर आलं ज्यामध्ये ५२ वर्षीय पालिका कर्मचार्‍याची चाचणी पॉझिटिव्ह आली. तो वरळी इथं राहतो. पण त्याला धारावीत लक्षणं जाणवली.

वरळी कोळीवाड्यात ३५ हजार पेक्षा जास्त नागरिक राहतात. याशिवाय प्रभादेवी, गोरेगाव आणि इतर अनेक ठिकाणी पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यानं पालिका सेनिटायझेशन करत आहे.


हेही वाचा

५० हजारपेक्षाही कमी किमतीत तयार होणार व्हेंटिलेटर

Coronavirus : पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात १५० जण, १४ दिवसाच्या क्वारंटाईनमध्ये

पुढील बातमी
इतर बातम्या