५ लाख प्रवाशी परदेशातून मुंबई विमानतळावर दाखल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मागील ७ महिन्यांच्या कोरोना व्हायरसच्याकाळात मुंबई विमानतळावर ५ लाख ६ हजार प्रवाशांचं परदेशातून आगमन झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रवाशांपैकी दुबई आणि लंडन येथून अधिक प्रवासी मुंबईत दाखल झाले असून, त्या ठिकाणी देखील सर्वाधिक प्रवासी गेले आहेत. शिवाय, या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर १२ हजार ५६० विमानांचे उड्डाण व आगमन झाले आहे.

लॉकडाऊन शिथिलीकरणानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा अधिक चालवण्यात आल्या. परदेशात कोरोनाचा हाहाकार होताच तेथील भारतीयही परतू लागले. ‘वंदे भारत’अंतर्गत विमान सेवाही चालविण्यात आल्या होत्या. मे महिन्यात १ हजार ६० विमान सेवातून १० हजार ३०० प्रवाशांचं आगमन व उड्डाण झाले, तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत हीच संख्या २ हजार ३०० विमानसेवा आणि १ लाख ४४ हजार ४०० प्रवाशी एवढी झाली.

कोरोनाकाळात नवीन २९ आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरही सेवा देण्यात आली. यात लुसाका, मोम्बासा यासह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. दुबईसाठी सर्वाधिक २ लाख ६७ हजार ६०० प्रवाशांनी, तर त्यापाठोपाठ लंडन हीथ्रोसाठी ८९ हजार ८००, न्यूयॉर्कसाठी ८० हजार ८००, तर दोहासाठी ५८ हजार २०० आणि अबुधाबीसाठी ३९ हजार ४०० प्रवाशांनी उड्डाण व आगमन केल्याची माहिती मिळते.

पुढील बातमी
इतर बातम्या