घाटकोपरमध्ये वास्तूंना विवेकानंदांचं नाव

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

घाटकोपर - नगरसेवक प्रवीण छेडा यांच्या प्रयत्नांतून बांधण्यात आलेल्या वास्तूंना स्वामी विवेकानंद यांचं नाव देण्यात आलं आहे. स्वामी विवेकानंद वाचनालय (वृत्तपत्रं), अॅम्फी थिएटर, अमृत पाणपोई, क्लोवर उद्यान, स्वामी विवेकानंद चौक आणि स्वामी विवेकानंद लायब्ररी अशा सहा नवीन वास्तूंचं उद्घाटनही करण्यात आलंय. अमृत फाउंडेशन आणि प्रभाग 130चे नगरसेवक प्रवीण छेडा यांच्या निधीतून या सर्व वास्तू बांधण्यात आल्या आहेत. स्वामी विवेकानंद यांचं नाव सर्व ठिकाणांना देण्यात आलं आहे, कारण इथे आल्यानंतर सर्वांनाच आनंद मिळणार आहे. घाटकोपरला सांस्कृतिकनगर बनवण्याचा मानस आहे, असं छेडा यांनी या वेळी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या