मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून ६० लाखांचा दंड वसूल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका वारंवार मास्क लावून घराबाहेर पडणं बंधनकारक केलं आहे. मात्र, तरीही सार्वजनिक ठिकाणी अनेकजण मास्क न लावता घराबाहेर पडत आहेत. त्यामुळं फिरणाऱ्यांविरोधात महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मागील ६ महिन्यांत तब्बल १८ हजारांहून अधिक जणांवर कारवाई करीत तब्बल ६० लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. तसंच, रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून एक लाखापेक्षा अधिक दंड वसुली करण्यात आली.

एप्रिल महिन्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेत सुरुवातीला १ हजार रुपये दंड आकारला जात होता. मात्र, १३ सप्टेंबरपासून महापालिकेनं रक्कम कमी करून २०० रुपये दंड वसूल करण्यास सुरुवात केली. एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या १८,११८ जणांवर कारवाई करून ६० लाख ४ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कांदिवली परिसरात सर्वाधिक १७१६ लोकांवर कारवाई करण्यात आली. दंड वसुलीही या भागात सर्वात जास्त म्हणजे पावणे सात लाख इतकी करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्यांबरोबरच मुंबई महानगरपालिकेने रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधातही कारवाई सुरू केली आहे. त्यांच्याकडूनही २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. गेल्या  १५ दिवसांत महापालिकेनं ८५२ लोकांकडून १ लाख ४६ हजार दंड वसूल केला आहे. त्यात घाटकोपर परिसरातून सर्वाधिक २३२ जणांकडून ४० हजारांचा दंड वसूल केला आहे. त्यानंतर कुर्ला परिसरात १४५ जणांकडून १७,९०० दंड वसूल करण्यात आला.

पुढील बातमी
इतर बातम्या