कुर्ल्यातील (kurla) 6,834 मतदारांची नोंदणी प्रभाग 163 अंतर्गत चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) प्रारूप मतदार यादीतील विसंगती सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी अधोरेखित केली आहे. 29 नोव्हेंबर 2025 रोजी एल-प्रभागातील सहाय्यक महापालिका आयुक्तांकडे त्यांनी आक्षेप नोंदवला होता.
"अलीकडील सीमांकन प्रक्रियेमुळे, प्रारूप मतदार यादीतील अनुक्रमांक 1,634 ते 8,437 हा भाग सध्या प्रभाग 163 अंतर्गत दाखवला जात आहे.
तसेच तो मसुद्यात चुकीचा मॅप केला आहे कारण तो प्रभाग 162 मध्ये येतो. या प्रमाणात चुकीचे वर्गीकरण केल्याने महापालिका निवडणुकीच्या अचूकतेवर आणि निष्पक्षतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो," असे अनिल गलगली (anil galgali) म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी, सर्व 6,834 मतदारांना प्रभाग 163 मधून प्रभाग 162 मध्ये तात्काळ स्थलांतरित करावे, अशी मागणी या अनिल गलगली यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात धारावीतील (dharavi) एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डमध्ये 70,000 मतदारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यानंतर गलगली यांनी ही माहिती उघड केली.
मुंबई (mumbai) काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही जी-नॉर्थ वॉर्डच्या सहाय्यक महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपला आक्षेप नोंदवला आहे.
हेही वाचा