नवी मुंबईत कारचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, ७ जण जखमी

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबईत एका रिक्षा चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नवी मुंबईच्या पामबीच मार्गावर ही घटना घडल्याची माहिती मिळते. सिग्नल लागलेला असतानाही सिग्नल तोडून एक रिक्षा रस्ता ओलांडत होती. अचानक समोर आलेल्या रिक्षाला धडक टाळण्यासाठी कार चालकाने कार वळवली. मात्र कार अधिक वेगात असल्याने कारवर नियंत्रण मिळवता न आल्याने कारची रिक्षाला धडक बसली.

या घटनेत कार चालकाचा मृत्यू झाला असून, इतर ७ जण जखमी झाले आहेत. अपघातावेळी कार प्रचंड वेगात असल्यानं त्यावर नियंत्रण न मिळवता आल्यानं कार ५ ते ७ वेळा उलटून विरुद्ध दिशेच्या मार्गावर आदळली.

पामबीच मार्गावर अक्षर चौकात रविवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. वाशीकडून सीबीडीकडे जाणारी भरधाव कार अक्षर चौकात सिग्नल ओलांडत होती. त्यावेळी सिग्नल लागलेला असतानाही सिग्नल तोडून एक रिक्षा रस्ता ओलांडत होती. अचानक समोर आलेल्या रिक्षाला धडक टाळण्यासाठी कार चालकाने कार वळवली. मात्र कार अधिक वेगात असल्याने कारवर नियंत्रण मिळवता न आल्याने कारची रिक्षाला धडक बसली.

यावेळी कारमध्ये चालकासह ४ व्यक्ती असल्याचं समजतं. त्यापैकी २ जण कार उलटत असतानाच कारमधून पडून जखमी झाले. अपघातामध्ये कार चालकाचा कारमध्येच चेंगरून मृत्यू झाल्याची माहिती मिळते.

अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेमुळे पामबीच मार्गावरील बेशिस्त वाहतूक पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या