आता मध्य रेल्वेवर वॉटर व्हेंडिंग मशिन, स्वस्तात मिळणार पाणी!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेल्वे स्थानकांतील सार्वजनिक पाणपोया बऱ्याचदा अस्वच्छ असल्याने प्रवासी घसा कोरडा पडला, तरी तहान भागवण्यासाठी तेथे फिरकत नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोईसाठी स्थानकांवर 'हायटेक ऑटोमॅटिक वॉटर व्हेंडिंग मशीन्स' बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या मशिनद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाण्यासाठी प्रवाशांना शुल्क मोजावे लागणार असले, तरी येथे प्रवाशांना स्वच्छ पाणी मिळणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) मार्फत ही सेवा सुरु करण्यात आली असून आतापर्यंत मध्य रेल्वेच्या 20 स्थानकांवर 37 वॉटर व्हेंडिंग मशीन बसविण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेवरील सीएसटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि कल्याण स्थानकांवर प्रत्येकी 4, तर पनवेलमध्ये 3, इगतपुरीमध्ये 2, भायखळा, परेल, कुर्ला, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी, मुलुंड, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, मानखुर्द, किंग सर्कल आणि रे रोड या स्थानकांवर प्रत्येकी एक मशीन लावण्यात आले आहे.

या मशीनमध्ये एक रुपया टाकल्यास 300 मिली, तीन रुपयांत 500 मिली, पाच रुपयात एक लिटर, आठ रुपयांत 2 लिटर आणि 20 रुपयात पाच लिटर पाणी भरुन मिळेल. केवळ एक ग्लास पाण्याची गरज असणाऱ्या प्रवाशांनाही केवळ दोन रुपयांत पाणी उपलब्ध होईल.

पुढील बातमी
इतर बातम्या