दक्षिण मुंबईतून 91 गुन्हेगार तडीपार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - महानगरपालिकेची निवडणूक निर्भयी वातावरणात पार पडावी म्हणून मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना तडीपार करण्याची कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

मुंबईच्या पायधुनी, गिरगाव, गावदेवी, मलबार हिल या परिसरातून तब्बल 24 लोकांना पोलिसांनी ताडीपार केलं आहे. तर 91 जणांना संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बाहेर करण्यात आल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त ज्ञानेश चव्हाण यांनी दिली. एवढंच नाही तर याच परिसरातून तब्बल सहा सराईत गुन्हेगारांना देखील अटक करण्यात आली आहे.

तौसिफ खान, सलमान शेख, मोहम्मद फारुख खान, मोहम्मद इसाक जिलानी शहा, आरिफ कुरेशी मोहम्मद सलीम आणि अन्वर आलिम यांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांकडून दोन पिस्तुलं आठ जिवंत काडतूसं, 1 चॉपर, 1 चाकू, मिरची पूड आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईसह आता मुंबईच्या इतर ठिकाणीही अशा कारवाया करण्यात येणार असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या