मुंबईकरांना पेट्रोल दरवाढीचा धक्का

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस आणि रेल्वे तिकिटांच्या दरवाढीच्या धक्क्यातून अजून मुंबईकर सावरले नाहीत. त्यात नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईकरांसाठी अजून एक वाईट बातमी आहे. गुरुवारी ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा दणका बसला आहे.

मुंबईत 'इतकी' दरवाढ

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. मुंबईत पेट्रोल ८ पैसे आणि डिझेलच्या किमतीत प्रति लीटर १२ पैसे वाढ झाली. यामुळे मुंबईत पेट्रोल ८०.८७ रुपये आणि डिझेल ७१.४३ रुपये झाला आहे

दिल्लीत पेट्रोल ७५.२५ रुपये आणि डिझेलचा दर प्रति लीटर ६८.१० रुपये आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलसाठी ७७.८७ रुपये आणि डिझेलसाठी ७०.४९ रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ७८. २० आणि डिझेल ७१. ९८ रुपये आहे. या दरवाढीने बाजारात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

दरवाढिमागे हे कारण

गेली काही वर्ष अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये व्यापारी संघर्ष अधिक वाढला आहे. त्याचाच मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. दोन्ही देशांच्या कठोर भूमिकेमुळे खनिज तेल (क्रूड ऑइल) सोने, धातू यासारख्या उत्पादनांच्या किंमतीवर परिणाम होत आहे. याचा परिणाम २०२० साली पण राहणार आहे. त्यामुळे २०२० मध्येसुद्धा जागतिक बाजारात खनिज तेलाचे भाव चढेच राहण्याची शक्यचा आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या