३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर महापौरांची मॉलला अचानक भेट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या फिल्डवर उतरल्या आहेत. मुंबईत महापौराकडून सध्या अनेक ठिकाणी पाहणी सुरू आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दी होऊ नये यासाठी पालिका प्रशासन आणि महापौरांनी कंबर कसली आहे.

मॉल्स धारकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होतंय की नाही? यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून पाहाणी करण्यात आली. मुंबईतील ओबेरॉय मॉल, ग्रोव्हल मॉल आणि अंधेरीच्या इन्फिनिटी मॉलमध्ये महापौर किशोरी पेडणेकरांनी अचानक भेट दिली.

नागरिक मॉलमध्ये नियमांचे पालन करताना बघायला मिळत आहेत. मॉल्सच्या आतमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी स्वतंत्र्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सोबतच सॅनिटायझेशन आणि मॉलमध्ये आत येणाऱ्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे की नाही? सोबतच तापमान देखील चेक करण्यात येत आहे.

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. राज्यात मागील काही दिवसात कोरोना रुग्ण कमी झाल्यानं थोडा दिलासा मिळाला होता, निर्बंध थोडे शिथिल झाले होते, मात्र पुन्हा राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा 8 हजारांच्या पुढे गेल्यानं निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या