महापालिका म्हणते मला मुक्त करा!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

प्रतीक्षानगर - शिवकोळीवाडा येथे गुरुदत्त मित्र मंडळाच्या वतीने पालिकेची प्रतिकृती ऑक्टोपसच्या रुपात साकारून सामाजित समस्या मांडणारी होळी उभारण्यात आली. 

या समस्यांचे दहन या होळीत करण्यात येणार आहे. ही प्रतिकृती साकारण्यास एक महिन्याचा कालावधी मंडळातील कार्यकर्त्यांना लागला असून, महानगर पालिकेशी निगडीत असलेल्या नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर आधारित ऑक्टोपस रुपात ही होळी साकारण्यात आली. याची साधारण उंची 10 फूट आणि रुंदी 15 फूट आहे. 

बांबूंच्या कामट्या, पुठ्ठा, कागद आणि पाण्याच्या रंगाचा वापर करून ही प्रतिकृती बनविण्यात आली आहे. यात पाणी टंचाई, सांडपाणी अव्यवस्थापन, झोपडपट्टी, रस्ते घोटाळा, कचरा अव्यवस्थापन या समस्यांतून आता तरी मला मुक्त करा. 'जनतेची मागणी, मला पारदर्शक करा' अशा पद्धतीने होळीच्या दिवशी सामाजिक संदेश देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी ही होळी उभारण्यात अाल्याचे मंडळाचे प्रतिनिधी सिद्धेश कवटकर यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या