Lockdown 5.0 : ३ जूनपासून महाराष्ट्रात 'या' सेवांना असेल परवानगी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

३० मे शनिवार रोजी गृह मंत्रालयानं भारतातील कन्टेंमेंट झोनमधील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर ३१ मे ला महाराष्ट्र शासनानं 'मिशन बिगिन अगेन' नावाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांसह राज्यातील काही भागात टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जातील.

निर्बंध शिथिल करण्याबाबत अजय मेहता यांनी केलेल्या निवेदनात असं लिहिलं आहे की, "एमएमआर विभागातील महानगरपालिकांमध्ये एमसीजीएम, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, या महानगरपालिकांसह अमरावती आणि नागपूर इथल्या कंटेन्ट झोनशिवाय टप्याटप्यानं निर्बंध शिथिल केला जाईल."

मिशन बिगन अगेनचा एक भाग म्हणून फेज १ मध्ये महाराष्ट्रात ३ जून २०२० पासून कशाची परवानगी दिली जाईल हे खालीलप्रमाणे आहे.

१. मैदानी शारीरिक कार्य

सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासारख्या वैयक्तिक शारीरिक व्यायामास समुद्रकिनारे, सार्वजनिक / खाजगी क्रीडांगणे, सोसायटी / संस्था, मैदानाचे मैदान, उद्याने आणि सार्वजनिक मोकळ्या जागांवर परवानगी आहे. अंतर्गत भागात किंवा अंतर्गत स्टेडियममध्ये कोणत्याही प्रकारच्या कार्यास परवानगी दिली जाणार नाही.

  • सकाळी ५ ते सायंकाळी ७ दरम्यान यास परवानगी असेल.
  • कोणत्याही ग्रुप कार्यास परवानगी दिली जाणार नाही. फक्त मुलांबरोबर प्रौढ व्यक्ती आवश्यक असले.
  • लोकांना मर्यादित कालावधीत किंवा ठराविक वेळेत शारीरिक हालचालींच्या उद्देशानं घराबाहेर रहाण्याची परवानगी दिली गेली आहे. इतर कोणत्याही कार्यास परवानगी नाही.
  • लोकांना फक्त जवळपास / शेजारच्या मोकळ्या जागांचा वापर करण्याची परवानगी आहे.
  • लांब पल्ल्याच्या प्रवासास परवानगी दिली जाणार नाही. लोकांना गर्दी असलेल्या जागांना टाळण्याचा सल्ला दिला जातो.

२. स्वयंरोजगार लोकांशी संबंधित उपक्रम जसे की प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आदींना सोशल डिस्टंनसिंग, मास्क आणि सेनिटायझेशन याच्या निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे.

३. सर्व शासकीय कार्यालये (आणीबाणी, आरोग्य, वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, नगरपालिका सेवा जे आवश्यकतेनुसार पातळीवर कार्य करू शकतात) १५ टक्के कार्य करतील. किमान १५ कर्मचारी कार्यालयात काम करू शकतील.

मिशन बिगन अगेनचा एक भाग म्हणून, फेज 2 मध्ये महाराष्ट्रात 3 जून 2020 पासून काय परवानगी देण्यात येईल ते येथे आहे

१. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व मार्केट, बाजारपेठ आणि दुकाने PI-P2 तत्त्वावर चालण्याची परवानगी आहे. (रस्त्याच्या एका बाजूला दुकाने / लेन / पॅसेज वेगवेगळ्या तारखांना उघडल्या जातील. तर दुसऱ्या बाजूची दुकानं वगेळ्या तारखांना उघडली जातील. या सर्व अटींसह सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत परवानगी दिली गेली आहे.

२. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दुकानांमध्ये कपडे बदलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रायल रूम्स बंद राहतील. त्याचप्रमाणे एक्सेंच पॉलिसी आणि रिटर्न पॉलिसीला परवानगी दिली जाणार नाही.

३. दुकानांमध्ये सामाजिक अंतराच्या निकषांची खात्री करण्यासाठी दुकानदार जबाबदार असतील. मजल्यावर कुठे उभं राहायचं यासाठी मार्किंग, टोकन सिस्टम, होम डिलिव्हरी इत्यादी गोष्टींसाठी प्रोत्साहन दिलं जाईल.

४. लोकांना जवळच्या मार्केटमध्येच शॉपिंगला जालं. शॉपिंगसाठी लांबचा पल्ला गाठू नये. जवळ जाण्यासाठी देखील चालत जावं किंवा सायकलनं, असा सल्ला दिला गेला आहे.

५. दुकानं किंवा बाजारपेठेत सोशल डिस्टनसिंगचे नियम धाब्यावर बसवलेले दिसले तर त्वरीत त्या जागा बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.

६. खाली प्रकारे लोकांना सार्वजनिक आणि खाजगी गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी आहे.

  • टॅक्सी कॅब / अ‍ॅग्रीगेटर - केवळ आवश्यक - १ + २ पॅसेंजर
  • रिक्षा - केवळ आवश्यक - १ + २ पॅसेंजर
  • चारचाकी वाहन - केवळ आवश्यक – १ + २ पॅसेंजर
  • दुचाकी - फक्त आवश्यक – १

मिशन बिगन अगेनचा एक भाग म्हणून , 8 जून 2020 पासून लागू असलेल्या फेज 3 मध्ये महाराष्ट्रात काय परवानगी दिली जाईल ते इथं आहे.

  • सर्व खाजगी कार्यालये आवश्यकतेनुसार १०% पर्यंत कार्य करू शकतात आणि उर्वरित व्यक्ती घरून काम करतील.
  • कर्मचाऱ्यांना सुरक्षित घरी सोडण्याबाबत योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. खास करून वृद्धांचा गट असेल त्यांना संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या