मुंबईकरांना प्रीपेड वीजमीटरचा 'शॉक'? अदानीकडे कंत्राट, बेस्टला भुर्दंड, काँग्रेसचा आरोप

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील बेस्टचे मीटर्स आता अदानी बसवणार आहे. हे मीटर्स प्रिपेड पद्धतीने बसवले जातील, अशी माहिती रवी राजा यांनी ट्विट केली आहे. यासोबतच त्यांनी या निर्णयाला विरोध करत मुंबईकरांसाठी किती तोट्याचा करार आहे याचे स्पष्टीकरण देणारे मुद्दे मांडले आहेत. 

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंबई शहराला वीज पुरवठा हा बेस्ट अंडरटेकिंगकडून होतो.  पण येत्या सप्टेंबर महिन्यापासून मुंबई शहरांत अदानी इलेक्ट्रिकल कंपनीची मीटर्स बसवली जातील, ज्याचं टेंडर पास झालं आहे. ही ऑटोमॅटिक प्रीपेड मीटर्स असतील,ती सगळ्यांना कम्पल्सरी होतील. मीटर्सची किंमत ९५०० रुपये प्रतिमीटर आहे.

ह्यातील १३०० रुपये केंद्र सरकार देणार आहे आणि उरलेले पैसे हे बेस्ट अंडरटेकिंग देणार आहे.हे कॉन्ट्रॅक्ट जवळपास १३०० कोटी रुपयांचं आहे.मुळात तोट्यात सुरु असलेल्या बेस्ट अंडरटेकिंगला इतका मोठा आर्थिक भार सोसणार आहे का? ह्या कंपनीला १० वर्षांसाठीचं मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. 

ही मीटर्स प्रीपेड आहेत हा सगळ्यात मोठा धोका सामान्य मुंबईकरांसाठी आहे. मुंबई शहरात बेस्टचे १०.५० ग्राहक आहेत . त्यातील ४०% मीटर्स ही झोपडपट्टीत राहणाऱ्या घरांत आहेत, ३०% मध्यमवर्गीय नोकरदारांच्या घराची आहेत. प्रीपेड मीटर ही कल्पना ह्या वर्गाला धोक्याची आहे.

ज्यांचं आयुष्य दर महिन्याच्या पहिल्या तारखेला येणाऱ्या पगारावर अवलंबून आहे अशा लोकसंख्येला प्रीपेड मीटरचा बॅलन्स संपायला आल्यास त्याचा रिचार्ज करणं कसं शक्य होईल? ही ग्राहकांची लूट ठरेल आणि हे सगळं ह्या कंपनीच्या फायद्यासाठी केलं जात आहे, हे उघड आहे. 

ही कंपनी वीजबिलांची प्रीपेड वसुली करून ते बेस्ट प्रशासनाला देणार.हे बेस्टच्या खाजगीकरणाच्या दिशेने हे पाऊल आहे. ह्याला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे.माझी @mieknathshinde जी  @Dev_Fadnavis जी ह्यांना विनंती आहे की हे वेळीच थांबवाथांबवा,  असे ट्विट त्यांनी केले आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या