रायगडमध्ये बुडालेल्या MV मंगलम बार्जचे सर्व १६ सदस्य सुखरूप बाहेर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतीय तटरक्षक दलानं महाराष्ट्रातील रायगडमधील रेवदांडा बंदराजवळ बुडलेल्या एमव्ही मंगलम बार्ज (फ्लॅट प्लॅटफॉर्म शिप) मध्ये बसलेल्या सर्व १६ जणांना सुखरुप सोडवलं. या बचाव कारवाईत तटरक्षक दलाच्या जहाजासह नेव्ही हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली आहे.

छोट्या बोटीनं जेएसडब्ल्यू कंपनीच्या बार्जमधून ३ जणांना आणि चेतक हेलिकॉप्टरच्या मदतीने १३ जणांना वाचवण्यात आलं.

१७ जून रोजी सकाळी एमआरसीसी मुंबईला भारतीय मालवाहू जहाजातील अधिकारी एम.व्ही. मंगलम यांना टेलीफोनवर माहिती मिळाली की रेवदंडा जेट्टी (रायगड जिल्हा) किनाऱ्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हे जहाज बुडालं आहे. जहाज भरल्यामुळे चालक दल घाबरून गेला होता, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाची जहाज सुभद्रा कुमारी चौहान दिघी बंदरातून निघाली आणि मदतीसाठी संकटग्रस्त जहाजाकडे निघाली. दरम्यान, एमव्ही मंगलममधून चालक दलाला बाहेर काढण्यासाठी दमणच्या आयसीजी एअर स्टेशन वरून दोन हेलिकॉप्टरही लाँच करण्यात आले.

आव्हानात्मक परिस्थितीत चालक दलाच्या बचावासाठी आपल्या बोटी खाली उतरवल्या. त्यासोबतच आयसीजी हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचले आणि हवामानाची अनिश्चितता असूनही चालक दलानं बचावकार्य सुरू केलं.

जवळपास ६ तासांच्या प्रयत्नानंतर सर्व १६ चालक सदस्यांना यशस्वीरित्या वाचवण्यात आलं. वाचवण्यात आलेल्या चालक दलाला रेवदांडा इथं नेण्यात आलं असून त्यांची तपासणी केली जात आहे.


हेही वाचा

डहाणूत फटाका कंपनीत भीषण स्फोट, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या