हापूस मुंबईत दाखल, अावक वाढल्यानं किंमतीत घसरण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

फळांचा राजा हापूसनं आपल्या गोडीमुळे केवळ भारतातच नव्हं तर संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली  आहे. सर्वांचा आवडता कोकणचा हापूस यंदा मुंबईतील घाऊक बाजारात लवकर दाखल झाला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात हापूस बाजारात दाखल झाल्यानं त्याची आवक घटली आहे. याचा सरळ परिणाम हा हापूसच्या किंमतीवर झाला आहे.

जानेवारीतच हापूस बाजारात दाखल

वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात यंदा जानेवारीतच हापूसच्या राजाचं आगमन झालं. दरवर्षी मे महिन्यात येणारा हापूस यंदा जानेवारीतच बाजारात दाखल झाला. जानेवारीत देवगड हापूसच्या जवळपास ८५० पेट्या बाजारात दाखल झाल्या होत्या. यातल्या ६०० पेट्या कोकणातून आणि २५० पेट्या दक्षिण भारतातून आल्या आहेत. गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच इतका आंबा जानेवारी महिन्यात दाखल झाला आहे.  मात्र ११ फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी हापूसच्या १ हजार ४५० पेट्या बाजारात आल्या आहेत.

हापूसच्या किंमतीत घसरण

यंदा कोकणात हापूसचं उत्पादन अधिक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळेच बाजारात मोठ्या प्रमाणात हापूस दाखल झाला आहे. आवक वाढल्यानं हापूसच्या किमंतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. यंदा ४ ते ६ डझनच्या हापूसच्या पेटीची किंमत दोन हजार ते पाच हजारांच्या घरात आहे. गेल्यावर्षी हीच किंमत तीन ते सात हजारांच्या घरात होती.

पुढील बातमी
इतर बातम्या