आंबेडकर नगरमधील रहिवाशांचे धरणे आंदोलन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कुलाबा, कफ परेडमधील आंबेडकरनगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरावर 4 मे रोजी वनविभागाने तोडक कारवाई केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी तोडलेल्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करावे अथवा आर्थिक भरपाई दयावी या मागणीसाठी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या रहिवाशांना कोणतीही पूर्व सूचना न देता ही कारवाई करण्यात आल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन तेथील नागरिक बेघर झाले आहेत. ज्यांचे झोपडे तोडले त्यांना राहण्यासाठी कॅम्प तयार करावे आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी कफ परेड आंबेडकरनगर रहिवाशी संघाच्या वतीने समाजसेवक विठ्ठल चव्हाण यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या