अमूल दूध देशभरात २ रुपयांनी महाग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनामुळं महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असून, आता अमूलनं (Amul) दुधाच्या दरात वाढ घोषित केली आहे. १ जुलैपासून अमूल दूध देशभरात २ रुपयांनी महाग झाले आहे. गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यांत नवीन दर लागू करण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांच्या किंमती वाढवल्यानंतर अमूलने आता दुधाच्या किंमती वाढविल्या आहेत.

इनपुट आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे हे पाऊल उचलले गेले आहे. देशात अमूल दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर २ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आता अहमदाबादमध्ये अर्ध्या लिटर अमूल गोल्डची किंमत ३० रुपये आहे, अर्धा लिटर अमूल ताझा २४ रुपये असेल.

वाढत्या इनपुट कॉस्टमुळं अमूल को-ऑपरेटिव्ह सोसायटीनं दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं आपल्या सर्व ब्रँडमध्ये प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली आहे. आजच्या वाढीमुळे आता अमूल गोल्डचे दर ५८ रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहेत. याशिवाय अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी स्पेशल, अमूल स्लिम एन्ड ट्रीम दूध यामध्ये २ रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे.

१ जुलैपासून अहमदाबादमधील अमूल गोल्डचे दर ५०० मिलीलीटर प्रती २९ रुपये, अमूल ताजाचे ५०० मिली प्रती २३ रुपये आणि अमूल शक्तीचे दर ५०० मिली प्रती २६ रुपये असतील. २ लिटरच्या वाढीमुळे एमआरपीत ४ टक्के वाढ दिसून येते, जे सरासरी अन्नधान्य चलनवाढीपेक्षा खूपच कमी आहे.

इतर उत्पादनांच्या किंमतीही वाढू शकतात. दुधाचे दर वाढल्यानंतर आता अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. पनीर, लोणी, तूप, ताक, लस्सी, आईस्क्रीमच्या किंमतीही वाढू शकतात.

पुढील बातमी
इतर बातम्या