अंधेरी दुर्घटनेतील जखमी मनोज मेहता यांचे निधन : नानावटीमध्ये चालू होते उपचार

  • नितेश दूबे & सोनाली मदने
  • सिविक

अंधेरी येथील गोखले पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेले ५२वर्षीय मनोज मेहता यांचा रविवारी संध्याकाळी मृत्यू झाला. मुंबईतील नानावटी रुग्णालयात मनोज यांच्यावर उपचार चालू होते. २७ दिवसानंतर त्यांचे निधन झाले.

३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे अंधेरी-डहाणू रोड लोकल पकडण्यासाठी आलेले मनोज मेहता या दुर्घटनेत जखमी झाले होते. या दुर्घटनेत अस्मिता काटकर आणि मनोज मेहता हे दोघे गंभीर जखमी झाले होते, तर इतर लोकांना किरकोळ जखमी झाले होते. अस्मिता काटकर यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले होते.

मनोज यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पाठीच्या मणक्याला मोठा मार लागला असून त्यांना अंतर्गत दुखापती देखील झाल्या होत्या. रविवारी मल्टिपल ऑर्गन फेलीयर मुळे त्यांचे निधन झाले, अशी माहिती नानावटी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या