अण्णाभाऊ साठे चौकाची दुरवस्था

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंधेरी - जे.पी.रोड अंधेरी नवरंग सिनेमा समोर गेल्या वर्षी सुशोभिकरण करण्यात आलेल्या कै.अण्णाभाऊ साठे चौकाचे स्टीलचे पाईप तुटलेल्या अवस्थेत आहेत. काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक मोहसीन हैदर यांच्या प्रयत्नानं महानगर पालिकेच्या फंडातून या चौकाचं सुशोभिकरण करण्यात आलं होतं. मात्र चौकाच्या सुशोभीकरणाचं काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं केल्यानं स्टीलचे पाईप तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे सध्या चौकासमोर वाहन पार्किंग आणि कचरा टाकला जातो. याबाबत अंधेरी महात्मा फुले डॉ.बाबासाहेब विचार मंच्याचे कार्यकर्ता पंढरी कांबळे यांना विचारलं असता के पश्चिम वॉर्ड अधिकारी यांना लेखी तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याचं सांगण्यात आलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या