२५ जुलैला बोरिवली, दहिसरमधल्या 'या' भागात होणार अँटीजेन टेस्ट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या पश्चिम उपनगरात कोरोना रूग्णांची संख्या सातत्यानं वाढत असल्याचं दिसून येत आहे. हे पाहता, पालिका आता या भागात अँटीजेन चाचण्या अधिक घेतल्या जात आहेत. २५ जुलै रोजी, बोरिवली आणि दहिसर क्षेत्रात ही चाचणी घेतली जाईल. ज्यामध्ये लोकांची कोरोना तपासणी केली जाईल. मेरीलँड प्लेन्स, आयसी कॉलनी इथल्या नागरिकांची COVID 19 अँटीजेन चाचणी २५ तारखेला घेण्यात येईल.

२५ जुलै २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही चाचणी घेतली जाईल. या भागातील सर्व दुकानदारांची अँटीजेन चाचणी घेण्यात येईल. म्हणून जर एखाद्या दुकानदारास कोरोना असेल तर कोरोना संसर्ग ग्राहकांमध्ये पसरणार नाही. महानगरपालिके द्वारे १४ जुलै ते २१ जुलै दरम्यान जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बोरिवलीमध्ये ३२ दिवस आणि कांदिवलीत ३५ दिवसात कोरोना रूग्णांची संख्या दुपटीनं वाढत आहे.

१४ जुलै ते २१ जुलै या कालावधीतील आकडेवारीनुसार, २१ जुलैपर्यंत बोरिवलीमध्ये एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ६७४ आहे. तर १४ जुलै रोजी बोरिवलीमध्ये रुग्णांची संख्या ४ हजार ०१४ होती. बोरिवलीमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ३२ दिवसांत दुप्पट होत आहे.


हेही वाचा

मुंबईत दिवसभरात १०६२ नवे रुग्ण, ५४ जणांचा दिवसभरात मृत्यू

राज्यात ९६१५ कोरोनाचे नवे रुग्ण, दिवसभरात २७८ जणांचा मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या