महाराष्ट्रातील (maharashtra) पोलीस कॉन्स्टेबल आणि जेल कॉन्स्टेबल संवर्गातील 15,631 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरतीला (police bharti) मान्यता दिली आहे.
राज्यातील पोलीस कॉन्स्टेबल आणि जेल कॉन्स्टेबल संवर्गातील 15,631 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी या भरतीला मान्यता देणारा सरकारी निर्णय जारी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही भरती आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या भरतीमध्ये रिक्त राहिलेल्या पदांचा समावेश असेल आणि ती 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान भरली जातील. हा प्रस्ताव 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला होता आणि त्याला मान्यताही देण्यात आली आहे.
एकूण 15,631
हेही वाचा