खड्डेमुक्त मुंबईचा पालिकेचा संकल्प

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबईकरांची खड्ड्यांतून कायमची मुक्तता करण्याचा संकल्प मुंबई महानगरपालिकेनं केलाय. पावसाळ्यात सातत्यानं ज्या रस्त्यांवर खड्डे पडतात, असे रस्ते महापालिकेनं शोधून काढलेत आणि हे रस्ते खड्डेमुक्त करण्याचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी बुधवारी स्थायी समितीत दिली. यासाठी 64 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या कामांसाठी येत्या दोन दिवसांत निविदा निघेल, तर ही कामं आचारसंहितेच्या कात्रीत अडकू नयेत, म्हणून आवश्यक त्या परवानग्याही घेण्यात आल्यात, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

गझदरबंध पंपिंग स्टेशन मार्चमध्ये कार्यान्वित

मुंबईत 90 ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांची कामे सुरू आहेत. यासाठी 1 हजार 686 कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. यातील 27 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेलं गझदरबंध पंपिंग स्टेशनचं काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च 2017 मध्ये हे पंपिंग स्टेशन कार्यान्वित होईल. त्यापाठोपाठ 99 कोटी खर्चाच्या नाहूर पंपिंग स्टेशनचंही काम सुरू करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या