महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत फक्त ३ इमारती सील

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) उघड केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण मुंबईत फक्त ३ सील इमारती आहेत. सील केलेल्या ३ इमारतींपैकी दोन एल वॉर्ड (कुर्ला, चांदिवली) मध्ये आहेत आणि उर्वरित एक एम-पूर्व वॉर्ड (गोवंडी, मानखुर्द) मध्ये आहेत.

मुंबईत दररोज कोविड-19 प्रकरणांमध्ये घट होत आहे. यासोबतच शहरातील सील केलेल्या इमारतींच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ३० डिसेंबर रोजी सील केलेल्या इमारतींची संख्या २५ डिसेंबर रोजी २२ वरून १२८ वर पोहोचली होती. पाच दिवसांत कंटेनमेंट झोनही शून्यावरून ११ वर गेला होता.

पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितलं की, सील केलेल्या इमारतींची संख्या कमी होण्यामागे दैनंदिन प्रकरणांमध्ये होणारी घट हे महत्त्वाचे कारण आहे. याशिवाय, शहरात आता शून्य कंटेनमेंट झोन असल्याचंही समोर आलं आहे.

सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इमारतीच्या ताब्यात असलेल्या फ्लॅटमध्ये किमान १० कोविड-19 रुग्ण असल्यास इमारत सील केली जाऊ शकते.

शहरात गेल्या काही दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असून बाधितांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. रविवारी मुंबईत १ हजार १५३ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ५३६ नवे रुग्ण आढळले आहेत.

राज्यातील रुग्णसंख्येतही घट झाली असून, दिवसभरात ९,६६६ नव्या रुग्णांचे निदान झाले तर ६६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णांची संख्या १० हजारांपेक्षा कमी झाली आहे.


हेही वाचा

कोरोनाची तिसरी लाट मार्च महिन्यात संपणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुढील बातमी
इतर बातम्या