जाहिरातीच्या बॅनरचा बांबू बसच्या काचेत घुसला, वाहतुकीचा खोळंबा

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गणेशोत्सवादरम्यान लावलेल्या बॅनरचा बांबू बसच्या समोरच्या काचेत घुसल्यामुळे दादरमध्ये वाहतुकीचा खोळंबा झाला. मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस सुरू असताना 11 वाजून 20 मिनिटाला दादरच्या वीर कोतवाल उद्यान येथील प्लाझा सिनेमासमोरून 46 नंबरची बस काळा किल्ला येथे जात होती. त्याच वेळी गणेशोत्सवातील जाहिरातीचा बॅनरचा बांबू थेट बसच्या काचेत घुसला. 

जवळच बसस्टॉप असल्यामुळे अनेक प्रवासी उतरण्यासाठी बसच्या दरवाजात उभे होते. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पण यामुळे दादारचे रस्ते मात्र जाम झाले.

बांबू पडल्यानंतर काही प्रवाशांनापैकी एका व्यक्तीने खाली उतरून हा बांबू काचेतून काढल्यानंतर 20 मिनिटांनी वाहतूक सुरळीत झाली.

पुढील बातमी
इतर बातम्या