रस्ता कुणासाठी?

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

परळ - येथील पूर्वेकडील बुद्धमंदिर मार्गावरील पदपथ लाकडी बांबू आणि प्लास्टिकच्या पोत्यांनी व्यापलाय. त्यामुळे पादचाऱ्यांना इथून जीव मुठीत घेऊन जा-ये करावी लागतोय. पदपथावर अनधिकृतरित्या साठवून ठेवलेल्या या ढिगाऱ्यांमुळे घाणीचं साम्राज्यही वाढू लागलंय. मात्र महापालिका प्रशासन त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही.

या परिसरात मोठ्या संख्येनं बांबू व्यावसायिक आहेत. त्यामुळे या पदपथावर वर्षानुवर्षं या बांबू आणि पोत्यांचा पसारा पडलाय. यावर कारवाई होणं गरजेचं आहे. असं स्थानिक महिला कोमल पंदारे यांनी सांगितलं.

याबाबत सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्याशी संपर्क केला असता, या ठिकाणाची पाहाणी करून तेथील सामान हटवलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या