उडत्या कंदीलावर २२ जानेवारीपर्यंत बंदी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नववर्षाच्या स्वागतासाठी हौसेने फटाके उडवले जातात. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या संख्येने ‘उडते कंदील’ आकाशात पाठवून मोठ्या प्रमाणात ‘इव्हेंट’ साजरे केले जात आहेत. पहाटेच्या वेळी नरीमन पाईंट किंवा इतर ठिकाणी नववर्षाच्या स्वागतानिमित्त विविध कार्यक्रम होतात. मात्र, या वर्षी दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर ‘उडत्या कंदीलां’वर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. कंदील उडवणे सोडाच त्याची विक्री, ‘स्टॉक’ केला तरी पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत.

असं केल्यास गुन्हा दाखल होईल

मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांनी ३० दिवस ‘उडता कंदील’ उडवण्यास प्रतिबंधक करणारा आदेश काढला आहे. या कंदिलांची विक्री, स्टॉक तसेच ते आकाशात उडवल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलमनुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

पॅराग्लायडिंगलाही बंदी

दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर कायमच मुंबई असल्याने पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. दहशतवाद्यांकडून वेगवेगळ्या कुल्प्ता राबवल्या जाऊ शकतात, त्या अनुषंगाने पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. विमानतळ परिसरात पॅराग्लायडिंगला बंदी घातली आहे. आकाशात उडते कंदील सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या