माहीमकरांचं सरकारला साकडं

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

माहीम - महापालिका आयुक्त अजॉय मेहता आणि महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडे माहीम येथे राहाणाऱ्या इरफान मच्छिवाला यांच्यासह काही स्थानिक नागरिकांनी काही महत्त्वाची विनंती अर्जाद्वारे केली आहे. या विनंती अर्जामध्ये त्यांनी काही विषेश मागण्या आणि विनंती केली आहे.

अर्जात केलेल्या मागण्या

  1. सरकारने (liquor) महाराष्ट्रात वाढणारे दारूचे प्रमाण कमी करावे
  2. बेकरीत बनवल्या जाणाऱ्या जागेचे निरीक्षण करून अशा बेकरी पदार्थांवर तसेच त्या दुकानांवर बंदी आणली जावी. जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवणार नाही
  3. टीव्ही, प्रसार माध्यमांवरील चालणारे भविष्य सांगणारे कार्यक्रम बंद करावे
  4. मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणारे फटाके यांच्यावर आळा घालावा
  5. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा मांजा (glass coated) असल्याने त्याच्यावर बंदी आणावी आणि कॉटनच्या धाग्याचा वापर पतंगाच्या मांज्यासाठी केला जावा.
पुढील बातमी
इतर बातम्या