जंतूनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक, सॅनिटेशन व्हँन अथवा टनेलचा वापर थांबवा

देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी सँनिटेशन व्हँन  डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो म्हणून  फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये अशी सूचना आता केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.

पुण्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत, स्थानिक पोलिस ही  स्वत:चा जिव धोक्यात घालून , ड्युटी करत असल्यामुळे त्यांना या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांनी 'संजीवनी व्हँन'ची संकल्पना अंमलात आणली. त्यानंतर विविध राज्यात असे ठिक ठिकाणी सँनिटशन टनल उभे करण्यात आले. तर मुंबई पोलिसांनी सँनिटेशन व्हँनच तयार केली. या वाहनात एखादा कर्मचारी साधारण 10 सेकंद थांबल्यास निर्जंतुकीकरण होण्यास मदत असे बोलले जात होते. माञ केंद्राने पाठवलेल्या या अहवालामुळे राज्यात आता ठिक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उभारण्यात आलेले हे टनल किंवा डोम बंद करावे लागणार आहेत. 

कारण शनिवारी सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून राज्यात या प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळविले आहे. राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत असून त्याद्वारे व्यक्ती किंवा समुहावर वापर केला जात आहे. यासाठी वापरले जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना आटील यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे लवकरतच हे सँनिटेशन डोम आणि टनल हटवले जाणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या