उद्यानात 4 वर्षांपासून वीजचं नाही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चेंबूर : चेंबूरमधील चरई तलावाजवळ असलेल्या उद्यानात गेली ४ वर्ष लाईटच नाहीये. संध्याकाळ झाली की या उद्यानात कोणीही फिरकत नाही. त्यामुळे सध्या हे उद्यान गर्दुल्ले आणि प्रेमी युगुलांचा अड्डा बनला आहे. एखादी अनुचित घटना घडल्यावरच पालिकेला जाग येईल का असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांकडून विचारला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून पालिकेने या उद्यानासाठीच्या विजेचे बीलच भरलेले नाही. चार वर्ष या उद्यानात लाईटच नसल्याने उद्यानात येणा-यांची संख्या देखील घटली आहे. याचाच फायदा काही गर्दुल्ले आणि गुन्हेगारांनी घेतला आहे. लाईट बंद असल्याने हे लोक नशा करण्यासाठी उद्यानाच्या जाळ्यांवरुन उडी मारुन प्रवेश करतात. त्यातच काही प्रेमी युगुल देखील अंधाराचा फायदा घेत या उद्यानात अश्लिल चाळे करतात. त्यामुळे बलात्कार अथवा एखादी अनुचित घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येईल का अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या