बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेने परत पाठवला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - स्थायी समितीच्या बैठकीत बेस्टच्या अर्थसंकल्प चुकीचा असल्यामुळे परत पाठवण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली होती. नियमानुसार बेस्टच्या अर्थसंकल्प हा किमान 1 लाख शिलकीचा दाखवणे बंधनकारक आहे. परंतु हा अर्थसंकल्प तुटीचा दाखवला होता, जो नियमानुसार चुकीचा आहे. त्यामुळे स्थायी समितीने हा अर्थसंकल्प रेकॉर्ड केला होता. मंगळवारी 2017-18 चा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते यांनी हा अर्थसंकल्प बेस्टकडे परत पाठवून देण्याची उपसूचना मांडली. ही उपसूचना मान्य करत हा अर्थसंकल्प पुन्हा बेस्टकडे पाठवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुढील बातमी
इतर बातम्या