मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना बेस्ट बसच्या तिकीट दरात ५० टक्के तिकीट सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात आहे. यासाठी महापालिका ५० टक्के रक्कम बेस्ट उपक्रमास दिणार आहे. त्यामुळे दोन वर्षांनी एकदा ज्येष्ठांना निम्म्या दरात बसमधून प्रवास करण्याचं स्वप्न साकार होत आहे.
महापालिका भागवणार खर्च
बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात चालला असून त्यामुळे सवलती दिल्या जाणाऱ्या सर्व प्रवास सेवा बंद करण्याची शिफारस केली जात आहे. महापालिका आयुक्तांनी, बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत देताना काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती रद्द करण्याची शिफारस केली आहे.
सध्या बेस्टने सवलतीच्या दरातील सेवा सुरू केली असली तरी ज्येष्ठांच्या प्रवासी तिकीट दरातील ५० टक्के सवलतीचा खर्च महापालिका भागवणार आहे.
५० टक्के प्रवास सवलत
मुंबईतील वयाच्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बेस्ट उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करताना ५० टक्के प्रवास सवलत देण्यासाठी आणि या खर्चाची रक्कम बेस्ट उपक्रमाला महापालिकेच्या सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पातील जेंडर बजेटमधून भागवण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्यक्ष प्रवासाच्यावेळी पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून ५० टक्के रक्कम प्रवास शुल्क म्हणून घेण्यात येणार आहे. मागील अर्थसंकल्पात महापालिकेने या अनुदानासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु प्रत्यक्षात तेव्हा पूर्ण निधी खर्च होऊ शकला नव्हता.
'या' बैठकीत निर्णय
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे महापालिकेकडे बेस्ट बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची मागणी केली जात होती. या मागणीनुसार सन २०१६ मध्ये तत्कालिन महापौर स्नेहल आंबेकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना ५० टक्के प्रवास सवलत दिली जावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले होते. यासाठी लागणारे अनुदान महापालिकेने देण्याचा निर्णय घेतला होता. दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या धर्तीवर ही सवलत महापालिका आणि बेस्ट यांच्याकडून राबवण्यात येणार आहे.
यासाठी 'हा' पुरावा आवश्यक
ज्येष्ठ नागरिकांना बेस्ट प्रशासनाकडून मागणीनुसार स्मार्ट कार्ड निश्चित केलेलं शुल्क आकारून देण्यात येतील. त्यासाठी नागरिकांना रहिवासी पुरावा आणि वयाचा पुरावा बेस्ट उपक्रमाच्या कार्यालयात जावून अर्जासोबत जोडून सादर करणे आवश्यक राहिल, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.
महापालिका शाळांमधील मुलांना शालेय प्रवास मोफत उपलब्ध करून देण्यासाठी बेस्टला अनुदान दिलं जात आहे. ज्या महापालिका शाळांमधील मुलं बेस्ट बसमधून प्रवास करतात, त्या प्रवासाचे शुल्क महापालिकेच्यावतीने बेस्टला भरले जाते.