म्हणून बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बोनस रखडला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दिवाळीपूर्वी झालेल्या बेस्ट प्रशासनाच्या बैठकीत बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी केली होती. मात्र, बोनसबाबतचा रितसर प्रस्ताव आणला नव्हता. दरम्यान, बुधवारी झालेल्या बैठकीत महाव्यवस्थापकांनी बोनस बाबतचा प्रशासनाच्या मंजुरीकरता आणला होता. परंतु, बोनसबाबतचा हा प्रस्ताव आयत्यावेळी आल्याचं सांगत विरोधी पक्ष नेत्यांनी प्रस्ताव विचारात घेण्यास विरोध केला.

प्रस्ताव पुढे ढकलण्याची मागणी

महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी आणलेला प्रस्ताव बुधवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाने मांडला. या प्रस्तावात बोनस दिल्यामुळे उपक्रमावर २२.५० कोटींचा खर्च येणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु नियमानुसार, ७२ तासांच्या आत आलेले प्रस्ताव विचारात न घेण्याचा अधिकार सदस्यांना असतो. त्यामुळे याच नियमानुसार विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी हा प्रस्ताव पुढे ढकलण्याची मागणी केली.

म्हणून बोनस रखडलेलाच

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा, अशी मागणी सदस्यांनी महाव्यवस्थापकांकडे केली होती. त्यावेळी दिवाळीपूर्वी महाव्यवस्थापकांनी याबाबच तोंडी ५५०० रुपयांचा बोनस देण्याचं जहीर केलं होतं. परंतु, बोनसबाबतचा प्रस्ताव त्यांनी आणला नव्हता. त्यामुळे दिवाळी संपली तरी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही. दरम्यान, त्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाने हा प्रस्ताव आणला होता, मात्र विरोधीपक्ष नेत्यांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव बेस्ट समितीच्या पुढील बैठकीत मांडला जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या