कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

परळ - महापालिका सामान्यांच्या गरजांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप अनेकदा होतो. पण याला एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे अपवाद ठरलेत. त्यांनी कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करण्याचा छोटासा प्रयत्न केलाय आणि त्यांचा हा प्रयत्न यशस्वीही झालाय.

कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सल्लागार पातळीवरच अडकला. त्यानंतर पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांनी कार्यालयातील कॅन्टीनच्या पाच किलो कचऱ्यापासून 4 तास चालेल एवढ्या गॅसची निर्मिती करण्याचा प्रयोग केलाय. हॉटेलच नाही, तर हॉस्पिटल, स्मशानभूमी अशा ठिकाणीही या गॅसचा वापर करण्याची योजना आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या