बस डेपोत लागणार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • सिविक

शहरातील वाढतं प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने बेस्ट प्रशासनाने बस डेपोमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांचं चार्जिंग करता येणार आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने सादर केलेल्या अहवालानंतर ही माहिती समोर आली आहे.

कुठे लागणार चार्जिंग स्टेशन?

बेस्टच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वरळी आणि बॅकबे येथील बस आगारात चार्जिंग स्टेशन लावण्यात येईल. याच्या साहाय्याने इलेक्ट्रिक कारचीही चार्जिंग करता येणार आहे.

किती असेल दर?

परिवहन आणि वीज वितरकाकडे सध्या बॅकबे आगारात चार्जिंग युनिट आहेत. विशेष म्हणजे दुकान, मॉल आणि इतर ठिकाणी प्रति युनिट 5.87 रुपये दर आकारले जातात. बेस्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यांचे दर ठरवण्याबाबत सध्या विचार सुरू आहे.

एप्रिल 2016 ते डिसेंबर 2017 दरम्यान राज्यात फक्त 1,748 इलेक्ट्रिक वाहनं नोंदणीकृत होती. तर एप्रिल 2017 ते डिसेंबर 2017 पर्यंत मुंबईत एकूण 18 इलेक्ट्रिक वाहनांनी नोंदणी करण्यात आली. यामध्ये 11 गाड्यांची नोंदणी ताडदेव आरटीओमध्ये करण्यात आली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या