भारत गौरव ट्रेनच्या यात्रेला सुरूवात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आयआरसीटीसी (IRCTC) अर्थात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेन टूर सुरू केली आहे. आजपासून 9 जून 2025 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या ट्रेनच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारत गौरव ट्रेन टूरला 100 टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एकूण 710 प्रवासी या प्रवासाचा लाभ घेणार असल्याची माहिती इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड कडून देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेन (bharat gaurav train) रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी यासारख्या ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेनमध्ये 710 प्रवासी संख्या आहेत. त्यापैकी 480 प्रवासी इकॉनॉमीमध्ये (स्लीपर), 190 प्रवासी कम्फर्टमध्ये (3 एसी) आणि 40 प्रवासी सुपीरियरमध्ये (2 एसी) बुक झाले आहेत.

पाच रात्री, सहा दिवसांच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि भव्य वारसा दाखवणार आहेत. हा दौरा महाराष्ट्र सरकार आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेन यात्रेचा प्रवासमार्ग -

मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई (mumbai).

भारत गौरव ट्रेन यात्रेतील ठिकाणं -

रायगड किल्ला - छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती

लाल महाल, पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले

कसबा गणपती व शिवसृष्टी,पुणे - पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय

शिवनेरी किल्ला - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ

भीमाशंकर ज्योतिर्लिंग - 12 ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ

प्रतापगड किल्ला - अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण

कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिर

पन्हाळा किल्ला - बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक


हेही वाचा

मुंब्रा रेल्वे अपघातात 8 प्रवासी मृत्यूमुखी

मुंबई महापालिका समुद्रात दिशानिर्देशक सौर दिवे बसवणार

पुढील बातमी
इतर बातम्या