मुंबई लोकल अपघाताच्या संख्येत मोठी वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेल्वे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामधील मृतांची आणि जखमींची संख्याही मोठी आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या तीन वर्षात मुंबई (mumbai) लोकलच्या (mumbai local) प्रवासादरम्यान 7560 प्रवासी मृत्यूमुखी पडले, तर 7293 जण जखमी झाले आहेत.

गर्दीचे अयशस्वी नियोजन, मर्यादित लोकलफेऱ्या आणि थांबे, वातानुकूलित लोकलचा सामान्य लोकलवरील ताण, रुळांभोवती कुंपणाचा अभाव, यांमुळे अपघात घडत आहेत.

मध्य रेल्वेवर (central railway) सर्वाधिक अपघाती मृत्यू ठाणे ते कल्याण या मार्गावर झाले आहेत. या मार्गावर झालेल्या अपघातांतील जखमींची संख्याही सर्वाधिक आहे. मुंबई लोहमार्ग पोलिसांनी (GRP) माहिती अधिकारात दिलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली.

सन 2024 मध्ये मध्य रेल्वेवर धावत्या लोकलमधून पडून 387 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. 788 जण जखमी झाले. या कालावधीत कल्याण जीआरपीमध्ये धावत्या लोकलमधून पडून 116 जणांचा मृत्यू, तर 157 जण जखमी झाले.

डोंबिवली (dombivli) जीआरपीमध्ये 39 मृत्यू आणि 96 जखमींची नोंद आहे. ठाणे जीआरपीमध्ये 68 मृत्यू आणि 107 जण जखमी झाल्याची नोंद आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर हे प्रमाण सुमारे 58 टक्के आहे.

मध्य रेल्वेवर सन 2022 मध्ये झालेल्या अपघातांत (accidents) 1585 प्रवाशांचा मृत्यू आणि 1153 जण जखमी झाले. गेल्या वर्षी यामध्ये किरकोळ घट झाली. 1533 प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वे अपघातांतील जखमींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सन 2024 मध्ये 1655 प्रवासी जखमी झाले

रुळ ओलांडणे, धावत्या रेल्वेतून पडणे, फलाट आणि रेल्वेच्या पोकळीत पडणे, आत्महत्या, हृदयविकाराचा झटका, विजेच्या धक्क्याने मृत्यू, आजारपण इ. कारणांमुळे प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत.

सन 2024 मधील अपघाती (मृत्यू/जखमी)

ठाणे - जखमी - 68, मृत्यू -107

कल्याण - जखमी - 116, मृत्यू -157

डोंबिवली - जखमी - 39, मृत्यू - 96

मध्य रेल्वेवरील संख्या - (मृत्यू/जखमी)

2024 - मृत्यू - 1533, जखमी - 1655

2023 - मृत्यू - 1650, जखमी - 1466

2022 - मृत्यू - 1585, जखमी - 1153

एकूण - मृत्यू - 4768, जखमी - 4274

पश्चिम रेल्वेवरील संख्या - (मृत्यू/जखमी)

2024 - मृत्यू - 935, जखमी -1042

2023 - मृत्यू - 940, जखमी - 975

2022 - मृत्यू - 922, जखमी - 1002

एकूण - जखमी - 2792, मृत्यू - 3019


हेही वाचा

मुंब्रा अपघाताबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

अकरावीची पहिली प्रवेश यादी 26 जूनला जाहीर होणार

पुढील बातमी
इतर बातम्या