आचारसंहिता आहे कुठे?

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शिवडी - सध्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आचार संहिता लागू आहे. मात्र आचार संहितेला सत्ताधाऱ्यांनीच हरताळ फासल्याचं शिवडीमध्ये निदर्शनास आले आहे. भाजापा शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या रामदास आठवलेंच्या रिपाइंने हा हरताळ फासलाय.

रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक शिवडीमध्ये युवा वॉर्ड अध्यक्ष ओम हेमंत सावंत यांनी बसस्टॉपवर लावले होते. मात्र आचार संहिता असूनही ते फलक अजूनही तसेच आहे. दरम्यान पालिका एफ-दक्षिण विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

पुढील बातमी
इतर बातम्या