मुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतही कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत घट झालेली असतानाच, काळ्या बुरशीनं पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. मुंबईत एक महिला रुग्ण आढळून आली आहे. एका ७० वर्षीय महिलेचा ५ जानेवारी रोजी करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णामध्ये काळ्या बुरशीच्या संसर्गाची लक्षणे दिसू लागली आहेत. 

मुंबईतील एका रुग्णालयात या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेतही काळ्या बुरशीच्या संसर्गाने दहशत माजवली होती. कोविड १९ या आजारातून बरे झाल्यानंतर अनेक जणांना काळ्या बुरशीचा संसर्ग झाला होता. या आजारामुळे अनेक जणांच्या डोळ्यांना इजा झाली होती. तसेच अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. गेल्या २४ तासांत (गुरुवारी) २५, ४२५ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे ही दिलासा देणारी बाब आहे. याच कालावधीत ३६७०८ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर राज्यात ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

राज्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ही २ लाख ८७ हजार ३९७ इतकी आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासांत (गुरुवारी) करोनाचे १३८४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ५६८६ रुग्ण बरे झाले आहेत. १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या