मुंबईमध्ये (mumbai) दिवसेंदिवस वायू प्रदूषणात वाढ होत आहे. यासाठी मुंबई महापालिका (bmc) अनेक उपाययोजना राबवत असल्याचा दावा करत असली तरी मुंबई भोवताली असलेल्या झाडांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
मुंबईत सुरू असलेले रस्त्याचे काम, मेट्रोचे काम, इमारतीचे बांधकाम यामधून निर्माण होणारी धूळ (dust) ही संपूर्ण झाडांवर चिकटून राहत आहे.
त्यामुळे झाडांना कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळेही मुंबईच्या वायू प्रदूषणात घट होत नाही, अशी माहिती पर्यावरणप्रेमींनी दिली.
मुंबई हे देशातील सर्वात गजबजलेले आणि दाट लोकवस्तीचे शहर आहे. वेगाने होणारे शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाढती वाहतूक, बांधकामे हे सर्व घटक शहरातील वायू प्रदूषणात (pollution) मोठी भर घालत आहेत.
परिणामी प्रदुषणाची वाढलेली पातळी माणसांसह झाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे.
जी झाडे ऊन, पाऊस, वादळवारा यांच्यासमोर स्थिर उभी आहेत, ती झाडे रस्त्यांचे काँक्रीटीकरण, इमारतीचे बांधकाम यांच्यामधून उडणाऱ्या धुळीमुळे झाडांचे (trees) नुकसान होत आहे.
मुंबईच्या अनेक उंच झाडांच्या पानांवर तसेच बुंध्यावर धुळीचे थर साचले आहेत. त्यामुळे हे झाड धुक्यात हरवले असल्याचे दिसून येत आहे.
मात्र झाडांच्या या स्थितीमुळे झाडांना कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषून घेताना अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, झाडांसह माणसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
हेही वाचा