घाटकोपरमधल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

घाटकोपर - पंतनगर जंक्शन परिसरातल्या दोन एकर जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेने कारवाई केली. नर्सरी, वाहनतळ, खडी-रेतीवाले आदी अतिक्रमणांवर बुलडोझर चढवून ती जमिदोस्त करण्यात आली. तसेच भूमाफीया मोहम्मद कल्लू शाह याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 जेसीबी, 2 पोकलेन, खासगी आणि महापालिकेचे 15 डंपर, 50 पोलीस, महापालिकेचे 100 कर्मचारी यांच्या सहाय्याने ही सर्व अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली. हा दोन एकर भूखंड पालिकेने ताब्यात घेतला असून त्यावर कुंपणही घातले आहे.

पंतनगर जंक्शन परिसरातल्या दोन एकरच्या भूखंडावर पालिकेची वेगवेगळी आरक्षणे आहेत. त्यामध्ये रस्ता, अग्निशमन दल, महापालिका रुग्णालय, दवाखाना आणि हरित पट्टा या आरक्षणांचा समावेश आहे. मात्र, गेल्या ८-१० वर्षांपासून भूमाफीया मोहम्मद शाह याने या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभारली होती. नर्सरी, खडी-रेतीवाले, वाहनतळ अशा व्यावसायिकांच्या वापराकरिता सदर जागा त्याने भाडय़ाने दिली होती. महापालिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तसेच दिशाभूल करण्यासाठी त्याने 30 ते 40 खोटी प्रकरणे न्यायालयात दाखल केली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या