मुंबईकरांना दिलासा; अर्थसंकल्पात कुठलीच करवाढ नाही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं २०१९-२० या अार्थिक वर्षासाठी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहेअर्थसंकल्पात सध्याच्या करात कसलीही वाढ केलेली नाही. तसंच कोणतेही नवे कर प्रस्तावित नाहीतआयुक्त अजोय मेहता यांनी ३० हजार ६९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला.

अर्थसंकल्पातील तरतुदी

  • मुंबईची लाईफलाईन अर्थात 'बेस्ट'ला ३४.१० कोटी रुपयांची मदत
  • बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहत दुरूस्तीसाठी १० कोटी रुपयांची तरतूद
  • मुंबईच्या 'विकास आराखडा २०१४ - २०३४'च्या अंमलबजावणीसाठी ३३२३ कोटी
  • राणीबाग प्राणी संग्रहालय विस्तारीकरणासाठी ११० कोटी
  • दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ५ कोटी
  • महत्त्वकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी १६०० कोटी
  • गोरेगाव - मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी १०० कोटी
  • रस्ते विभागासाठी १५२० कोटी
  • पूल विभागासाठी ६०० कोटी
  • आरोग्य विभागासाठी ३६०१ कोटी
  • तानसा मुख्य जलवाहिन्यांलगत सायकल मार्गिकेसाठी १२० कोटी
  • विद्यमान करांमध्ये कोणतीही वाढ किंवा कोणतेही नवे कर प्रस्तावित नाहीत
  • महापौरांचे नवे निवासस्थान शिवाजी पार्कात होणार असून त्यासाठी १ कोटी रूपयांची तरतूद, २७४५ चौ.मी. जागेत होणाऱ्या या निवासस्थानाचं बांधकाम यावर्षीच सुरू होणार
  • देवनार इथं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीसाठी १०० कोटींची तरतूद
  • मुलुंड क्षेपणभूमी बंद करण्यासाठी ४३ कोटींची तरतूद
  • मालाड , महालक्ष्मी आणि देवनार येथे पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनीची सुविधा, ११.५० कोटींची तरतूद
  • पशु वैद्यकीय आरोग्य खात्यासाठी ३५.६० कोटी

  • वाहन तळ प्राधिकरणासाठी ३ काेटी

  • मुंबईतील वाहनांचे नियमन व व्यवस्थापनासाठी वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती

अारोग्यासाठी तरतूद

  • भगवती रुग्णालय ५९२ कोटी रुपये
  • नायर रुग्णालय २५० कोटी रुपये
  • भाभा रुग्णालय २९७ कोटी रुपये
  • सायन रुग्णालय ६५० कोटी रुपये
  • नायर दंत महाविद्यालय १५१ कोटी रुपये
  • टाटा रुग्णालय हॉस्टेल इमारत ५५ कोटी रुपये

  • अग्रवाल रुग्णालय ४९८ कोटी रुपये
  • कूपर रुग्णालय २९० कोटी रुपये
  • शताब्दी रुग्णालय ५०२ कोटी रुपये
  • लेप्रसी रुग्णालय १५५ कोटी रुपये


पुढील बातमी
इतर बातम्या