अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सायन - उच्च न्यायालयाच्या आदेशावरून मुंबईतील 33 अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येतेय. त्यानुसार सोमवारी सायनमधल्या दोन धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. गायकवाडनगर आणि अँन्टॉप हिल चर्च या दोन्ही ठिकाणांवरील अनधिकृत मंदिरे तोडण्यात आलीत. आतपर्यंत एकूण सात धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली.

न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली होती. "उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करूनच ही कारवाई करतोय," असं परिरक्षण आणि दुरुस्ती विभागाचे सहाय्यक अभियंता राजेश मेराई यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या