राजेंद्र नाल्यावरील अतिक्रमणांचा विळखा सुटला, नव्या रस्त्याचा मार्ग मोकळा

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • सिविक

बोरिवली पश्चिम येथील राजेंद्र नाल्याला विळखा घातलेल्या अतिक्रमणांवर शुक्रवारी महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आली. या नाल्यालगत असलेल्या सुमारे ५० अतिक्रमणे जमीनदोस्त केल्यामुळे लिंक रोड ते वसंत कॉम्प्लेक्सच्या नव्या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाल्याचं रुंदीकरण होणार

बोरिवली (प.) परिसरातील राजेंद्रनगर नाल्यालगत सुमारे ५० अनधिकृत बांधकामे होती. या अतिक्रमणांमुळे नाल्याच्या खोलीकरणाचे व रुंदीकरणाचे काम रखडले होते. याबरोबरच ‘दहिसर-गोरेगाव लिंक रोड’ ते वसंत कॉम्प्लेक्स दरम्यान होणाऱ्या नवीन रस्त्याचे कामही रखडले होते. यासर्व अनधिकृत बांधकामांवर आर-मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करण्यात आली आहे.

५०० मीटर लांबीचा नवीन रस्ता 

अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यामुळे आता राजेंद्रनगर नाल्याचे काम मार्गी लागणार अाहे. तसंच चिकूवाडी व वसंत कॉम्प्लेक्स परिसरात पावसाचे पाणी साचायचं, ती समस्या अाता दूर होणार अाहे. ही अतिक्रमणे हटवल्यामुळे सुमारे ५०० मीटर लांबीचा व ९ मीटर रुंदीचा नवीन रस्ता तयार करण्याचा मार्गही मोकळा झाला अाहे.

पुढील बातमी
इतर बातम्या