अंधेरीच्या अपना बाजार चौकातील फूटपाथ अतिक्रमणमुक्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंधेरी पश्चिमेकडील जयप्रकाश रोड अर्थात जे. पी. रोडवरील अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करत महापालिकेने सोमवारी ही सर्व दुकाने जमिनदोस्त केली. या सर्व स्टॉल्ससह कच्च्या बांधकामांनी फूटपाथवर अतिक्रमण केलं होतं, त्यामुळे पादचाऱ्यांना या फूटपाथऐवजी रस्त्यावरून चालावं लागत होतं. मात्र महापालिकेच्या कारवाईनंतर फूटपाथ मोकळं झालं असून पादचाऱ्यांना या फूटपाथवरून चालणं शक्य झालं आहे.

के/ पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सहायक अभियंता (देखभाल विभाग) यांच्या मदतीने या बांधकामावर कारवाई केली. अपना बाजार चौकातील पदपथावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत स्टॉल बांधल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानुसार या सर्व स्टॉलची पाहणी करून स्टाॅलधारकांना महापालिकेने नोटीस पाठवली.

तपासणीत हे स्टॉल्स २००० नंतरचे आढळून आले. त्यानुसार या सर्व स्टाॅल्सवर कारवाई करून ६५ स्टॉल आणि १७ कच्ची बांधकामे तोडण्यात आल्याची माहिती के/ पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या